25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरस्रीशिवाय घराला घरपण येत नाही : डोळे

स्रीशिवाय घराला घरपण येत नाही : डोळे

उदगीर  : प्रतिनिधी
इतरांच्या आरोग्य सांभाळता सांभाळता स्वत:चे आरोग्य बिघडू देऊ नका. जीवनशैली सकारात्मक व हसरी ठेवा. मन निरोगी ठेवण्यासाठी चेह-यावर निरपेक्ष हसू  ठेवा. सिरीयल पाहण्याबरोबरच वृत्तपत्र वाचत चला. छंद जोपासा. एकमेकांचे कौतुक करायला शिका .बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. बँकेचे व्यवहार करायला शिका. जगणं सुंदर आहे. फक्त आपले विचार चांगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहायला शिका. स्त्री शिवाय घराला घरपण नाही. हळदीकुंकू म्हणताना हळद (स्री) पहिल्यांदा व कुंकू (पुरुष )नंतर येतो, असे प्रतिपादन सौ.ज्योती डोळे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित सांगवी येथे विशेष युवक शिबीर प्रसंगी त्या अध्यक्षीय समारोपात बोलत होत्या. प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ.अरुणा ईटकापल्ले यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.सरोज गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.शल्पिा शेंडगे यांनी मानले. कार्यक्रमास सौ. राजश्री राठोड, सरपंच सौ. मीनाताई जोंधळे, प्रा.डाँ.कविता लोहाळे, सौ.वंदना गायकवाड, सौ लक्ष्मीबाई करडखेले, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. निवृत्ती  नाईक, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रामकृष्ण बदने, प्रा.डॉ.महेंद्र होनवडजकर, प्रा.लक्ष्मण अदावळे, प्रा.डॉ.बालाजी राठोड, प्रा. सुनील पवार, ग्रामस्थ महिला, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR