18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीस्रेहमिलन सोहळ्यातून ४४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट

स्रेहमिलन सोहळ्यातून ४४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट

परभणी : प्रतिनिधी
येथील एनव्हीएस मराठवाडा हायस्कूल परभणीच्या १९८० बँचचा स्रेहमिलन सोहळा दि.१० नोव्हेंबर रोजी कोकोनट लगून, पिंगळी रोड येथे पार पडला. ४४ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी एकमेकांशी गळाभेट आस्थेवाईकपणे चौकशी केली. देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या वर्गमित्रांनी आपला सविस्तर परीचय करून देत एकमेकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात त्यावेळी मुख्याध्यापक असलेले कै. ह.बा. दळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यात गुरूजन वर्गाचा सत्कार करण्यात आला. यात माजी शिक्षक बोबडे, शरद देऊळगावकर, अनिल अष्टुरकर, दत्तात्रण फडणवीस, नंदकुमार महेंद्रकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुरूजनांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्रेहभोजन कार्यक्रमानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात एकपात्री नाटक, भारूड आणि इतर फिल्मी गीते या स्वरूपाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आनंदाने भारावून गेलेल्या सर्व वर्गमित्रांनी दरवर्षी स्रेहमिलन कार्यक्रम घेण्याचे ठरवले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर लंगोटे, सतीश पत्तेवार, अखिल इनामदार, डॉ. शेख रशीद, सुरेश वाकोडे, सुभाष जोगळेकर, गोपाळ पेदापल्लीकर, दत्ता बलसेटवार, शमशोद्दीन तांबोळी, लता जाधव, शोभा वानखेडे, रेवती कुलकर्णी, संध्या देशपांडे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी नाईक यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लता जाधव यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR