24.2 C
Latur
Friday, September 5, 2025
Homeलातूरस्वच्छ लातूर, प्लास्टिकमुक्त लातूरची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ  

स्वच्छ लातूर, प्लास्टिकमुक्त लातूरची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ  

लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्लास्टिकमुक्त लातूर उप्रकमाचा शुभारंभ व्हावा, या सामाजिक जाणिवेतून ‘एकमत’ने शहरातील विविध संस्था, मान्यवर मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणस्नेही आणि शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या साथीने आज दि. १ सप्टेंबरपासून लातूर शहर व परिसरात माझं लातूर, स्वच्छ लातूर, प्लास्टिकमुक्त लातूर हा उपक्रम सुरु करण्यात आला.  या उपक्रमात सलग दुस-याही दिवशी शहरातील १० गणेश मंडळांना भेटी देऊन प्लास्टिकमुक्त लातूरची शपथ देण्यात आली तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
 स्वच्छ लातूर, प्लास्टिकमुक्त लातूरसाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ.   गुरुवारी सकाळी शहरातील लातूरचा चिंतामणी गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक., अंबाजोगाई रोड, खोरीगल्लीचा राजा गणेश मंडळ, जगदंबा मंदीरसमोर खोरीगल्ली, श्री जयवीर हनुमान गणेश मंडळ, सप्तश्रृंगी मार्ग मित्रनगर, शामराव पाटील विद्यालय गणेश मंडळ, मित्रनगर, तिरुपती गणेश मंडळ, नंदी स्टॉप, सावेवाडी, ओडीया राज गणेश मंडळ, सावेवाडी, त्रिमुर्ती गणेश मंडळ, पुर्णानंद मंगल कार्यालयाजवळ, सावेवाडी, आमचे ग्रीन लातूर गणेश मंडळ, एसटी वर्कशॉपसमोर, अंबाजोगाई रोड., शिव छत्रपती गणेश मंडळ, शामनगर, श्री गणेश मंडळ, शामनगर  या मंडळांचे विश्वकांत आगळे, प्रसाद पवार, अ‍ॅड. सुहास बेद्रे, मुख्याध्यापक एम. जी. गोस्वामी, ऋतिक मद्दे, आकाश इटकर, सुमुख गोविंदपूरकर, डॉ. भास्कर बोरगावकर, ओंकार जाधव व मंदार पाटील यांचा ‘एकमत’च्या वतीने संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, डॉ. बी. आर. पाटील, संदीप तिरुखे यांच्या हस्ते सत्कार करुन प्रत्येक गणेश मंडळांना ‘एकमत’चा माझं लातूर स्वच्छ लातूर, प्लास्टिमुक्तची शपथ असलेले फ्लेक्स आणि  पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR