धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदार संघात तानाजी सावंत यांच्याकडून मागील पाच वर्षात लोकप्रतिनिधित्व करताना मतदार संघासाठी वेळ देता आला नाही. त्याच्याकडे स्वत:च्या शैक्षणिक संस्था व साखर कारखानदारी असल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी जास्त वेळ दिला. पर्यायाने आपोआपच मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले असून तशी सर्वसासामान्य नागरिकांमध्ये ओरड सुरु झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा आमदार तानाजी सावंत नको रे बाबा अशी चर्चा या मतदार संघात जोरदार रंगू लागली आहे.
या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व मिळाल्यापासून मागील पाच वर्षात सावंत हे पुणे याठिकाणी सतत कार्यरत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्याकडे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत. या व्यवसायामुळे त्यांचे अधिक लक्ष हे स्वत:च्या व्यवसायाकडेच असल्याचे दिसून आल्याचे या मतदार संघातील नागरिक सांगतात. या त्यांच्या व्यवसायातून वेळ मिळाला तर ते जनतेसाठी उपलब्ध असतात. याच कारणामुळे मतदार संघातील नागरिकांना त्यांच्याकडील कामे करण्यासाठी ते ज्या ठिकाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी जावे लागते.
दिवस दिवस त्यांच्याकडे वेटिंगमध्ये थांबावे लागते ही वस्तुस्थिती आहे, भूम-परंडा-वाशी मतदार मतदारसंघातील तीनही तालुक्यातील मतदारांना आता पूर्णवेळ देणा-या आमदार मेळावा अशी चर्चा या मतदारसंघात जोर धरू लागली आहे. त्यामुळे हजारो कोटींचा निधी आणल्याचा कांगावा सावंत करत असले तरी या मतदारसंघातील मतदार त्यांना थारा देणार का हे पाहावे लागणार आह. भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजी सावंत हे मुळात शिक्षण सम्राट व साखर सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे येथे त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे मोठे जाळे आहे. त्यामुळे पुणे याठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या कामानिमित्त त्यांना सतत वास्तव्य करावे लागते. त्यातच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात त्यांनी साखर कारखाने चालवण्यास घेतले आहेत.
त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या उद्योग व्यवसायाकडे सर्वाधिक ते वेळ देतात असे नागरिकांमधून सांगण्यात येते. त्यामुळे ज्या भूम परंडा वाशी मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधित्व करतात त्या मतदार संघातील नागरिकांना वेळ देण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही, या मतदारसंघातील नागरिकांना छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यासह पुणे गाठावे लागते. त्या ठिकाणी गेल्यानंतरही ते लवकर भेटतीलच असे नाही. अनेकतास त्या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. केवळ छोट्याशा कामासाठीही या मतदारांना वेळ व पैसा घालवावा लागतो, असे याठिकाणी जावून आलेल्या काही व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
मागील पाच वर्षांत त्यांचा हा अनुभव मतदार संघातील नागरिकांना आला आहे. ज्या नागरिकांना त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव ते मतदार संघात इतरांना सांगत आहेत. त्यामुळे ही चर्चा भूम, परंडा, वाशी मतदारसंघात सर्वत्र जोरदार फिरू लागली आहे. त्यामुळे या मतदार संघातील नागरिकांना आता पूर्णवेळ देणारा आमदार हवा आहे. त्यासाठी ते नवीन पर्याय शोधत आहे, त्यामुळे आता पुन्हा सावंत हे आमदार नको रे बाबा अशी नागरिकांतून चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सावंतांना नाकारून या मतदारसंघात हे मतदार पर्याय म्हणून कोणाला शोधणार याकडे पाहवे लागणार आहे. यावरुन मात्र स्पष्ट होते की, या मतदार संघातील मतदारांना सावंत यांना या निवडणुकीत मतदारांना नकोसे झाले असे चित्र पहावयास व मतदाराच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.