22.3 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरस्वयघोषणापत्रावर तृतीयपंथींना सरकारी ओळख

स्वयघोषणापत्रावर तृतीयपंथींना सरकारी ओळख

लातूर : प्रतिनिधी
तृतीयपंथींना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांना मतदार म्हणून सरकार दरबारी ओळख देण्याचा उपक्रम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. यातूनच कोणतेही कागदपत्र न घेता केवळ स्वयघोषणापत्रावर तृतीयपंथींची मतदार म्हणून नोंदणी करण्याची सवलत निवडणुक आयोगाने दिली आहे. त्या पर्यायाचा अवलंब करुन उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी मतदार नोंदणीसाठी तृतीयपंथींमध्ये आत्मविश्वास जागवला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि अंतिम यादी प्रसिद्धीपूर्वीच्या शेवटच्या दिवशी दि. ४ जानेवारी रोजी १० तृतीयपंथींनी मतदार म्हणून नोंदणी केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने विशेष मतदार नोंदणी शिबीर आयाजित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली २३५- लातूर शहर मतदारसंघामध्ये लातूर तहसील कार्यालय येथे तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होत तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी फॉर्म भरुन दिले. लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. निवडणूक पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. मतदार नोंदीमध्ये समाजातील तृतीय पंथीयांचा अल्प प्रतिसाद लक्षा घेता लातूर शहर मतदारसंघामध्ये लातूर तहसील कार्यालय यथे तृतीयपंथींसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये उपस्थित सर्व तृतीयपंथीय लोकांचे मतदार नोंदणीचा भरुन घेण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार भिमाशंकर बेरुळे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शंकर अंगदराव जाधव यावेळी उपस्थित होते. सर्व तृतीयपंथीयांना मतदार नोंदणी करुन लोकशाही अधिक बळकट करावी. तसेच या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यमुळे हे समाजातील व्यक्त्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली, तर मतदार नोंदणी करु शकणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR