25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरस्वरीत पांचाळ यास पं. शांताराम चिगरी आवर्तन पुरस्कार 

स्वरीत पांचाळ यास पं. शांताराम चिगरी आवर्तन पुरस्कार 

लातूर : प्रतिनिधी
आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शास्त्रीय संगीतामधील उदयोन्मुख तबलावादक कलावंतास पंडित शांताराम चिगरी यांच्या नावाने दिला जाणारा पं. शांताराम चिगरी आवर्तन पुरस्कार देवाची आळंदी येथील  तबला नवाज स्वरीत बळवंत पांचाळ या गुणी उदयोन्मुख बाल तबलावादकास जाहीर झाला आहे.
पंडित शांताराम चिगरी गुरुजींचे पट्ट शिष्य विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून व यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ११ हजार रुपये रोख व मानपत्र असे आहे. स्वरीत याचे सुरुवातीचे शिक्षण वडील बळवंत पांचाळ यांच्याकडे झाले व मागील चार वर्षापासून तो पंजाब घराण्याचे प्रसिद्ध व ज्येष्ठ महान गुरु तबलावादक रचनाकार पंडित सुशीलकुमार जैन यांच्याकडे घरंदाज पद्धतीने सुरु आहे.
दि. २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता अष्टविनायक मंदिर गणेश हॉल येथे होणा-या ११२ व्या मासिक संगीत सभेमध्ये स्वरीत याचे तबला सोलो वादन आयोजित केले आहे. तरी आपण सर्व रसिकांनी या संगीत सभेसाठी यावे, असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या युवा कलावंताचे आवर्तनचे मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, कार्यक्रम नियोजन प्रमुख विशाल जाधव, डॉ. संदीप जगदाळे प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, कोषाध्यक्ष केशव जोशी, डॉ. वृषाली  देशमुख, डॉ. मंजुषा कुलकर्णी, शंभूदेव केंद्रे, विवेक डोंगरे, सुनील टाक, सतीश मिरखलकर, शरद होळकर तसेच आवर्तन परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR