सोलापूर : स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने श्री गुरु षटस्थलब्रम्ही तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होटगी मठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लिंगायत महासंघाचे समन्वयक सुरेश वाले यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे वधू-वर परिचय मेळावा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी व्यासपीठावर जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी काशी ज्ञानपीठ,श्री शिवपुत्र महास्वामीजी,सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ, सुदीप चाकोते,उदयशंकर पाटील,डॉ.वसंतराव लवंगे, राजशेखर पाटील गुरुराज माळगे, शरणराज केंगनाळकर,सुरेश पाटील श्रीकांत शिवपुजे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते. यावेळी जगद्गुरु म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाजातील पोट जाती न मानता वधू व वर यांना जास्त पसंती देऊन आपण आपला जोडीदार निवडावा व शेतकरी कुटुंबातील वरास जास्त प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय शासकीय यांसारखे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.शैलेश पाटील, डॉ. लक्ष्मीकांत दामा, ॲड.मल्लिनाथ शहाबादे, विक्रम खेलबुडे, शिवराज मिठारे,सुशीलाताई वाकळे, महानंदाताई लांडगे यांचा स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. या मोफत वधू वर परिचय मेळाव्यास तीनशेहून अधिक वधू-वरांनी आपला सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब कोठाणे, राजशेखर बुरकुले, शिवानंद सावळगी,ज्ञानेश्वर राजमाने आशिष दुलंगे,सागर अतनुरे,मल्लिनाथ सोलापूरे, अशोक वाले,राजू हौशट्टी,,डॉ.बसवराज बगले गणेश चिंचोली,आनंद मुस्तारे,सचिन शिवशक्ती, सचिन तुगावे,रोहित इटगी,अमृत वाकळे, शुभम शिवशक्ती,संतोष राजमाने,संतोष म्हमाने, शुभम घोंगडे,श्रीशैल वाकळे, सुधीर तमशेट्टी,पिंटू काटकर यांच्यासह सोलापुरातील विविध संघटनांनी वधू वर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदवला होता.