लातूर : प्रतिनिधी
प्रज्ञासूर्य, उपेक्षितांचे नायक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. या महापरिनिर्वाणामुळे भारतीय बहुजनांचा प्राणवायू निघून गेला. या दु:खदायी घटनेत आज ६७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानानिमित्त समस्त लातूरकरांच्या वतीने सामूहिक महाबुद्ध वंदना, अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अलोट गर्दीचा महासागर उसळला.
हजारों लेकरांनी भीमाच्या चरणी माथा टेकुन नतमस्तक झाले. लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक, उपासिका आणि समस्त लातूरकर पांढ-या शुभ्र वस्त्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भंतेजी पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाला. या प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर पूजनीय भिक्खु संघाच्या वतीने त्रिरत्न वंदना घेण्यात आली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बौद्ध धम्माची आचारसंहिता म्हणजे २२ प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला.
यावेळी भिक्खू पय्यानंद थेरो, भंते बोधिरत्न, भंते बुद्धशील, भंते विपसि, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विक्रम काळे, भा. ई. नगराळे, पृथ्वीराज शिरसाट, बाबासाहेब गायकवाड, बसवंतप्पा उबाळे, डॉ. विजय अजनीकर, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा. देवदत्त सावंत, संजय सोनकांबळे अॅड. धम्मदीप बलांडे, रणधीर सुरवसे, विश्वनाथ आल्टे, उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे, ज्योतीराम लामतुरे, निलेश बनसोडे, प्रा. सतीश कांबळे, अशोक कांबळे, अंतेश्वर थोटे, पांडुरंग अंबुलगेकर, राहुल शाक्यमुनी, अफसर शेख, मकरंद सावे प्रशांत पाटील, अॅड. व्यंकट ब्रेद्रे, मुर्तुजा खान, अख्तर मिस्त्री, नवनाथ आल्टे, लाला सुरवसे, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले, आशिष कोकाटे, मयुर बनसोडे, प्रविणसिंह थोरात, जहाँगीर शेख, मोहन दिवटे, सुहास बेंद्रे, कैलास काबंळे, विजय कांबळे, मयुर जाधव, सोहम गायकवाड, विनोद गरड, ब्रम्हानंद नारागुडे, सुरेखा पाटील, मधुमती शिंदे, अश्विनी माने, आरुषी सोनवणे, ज्योती देशमाने, शकुंतला कांबळे, वर्षा रेड्डी, सुमन उडानशिव, सरिता बनसोडे, शारदा लामतुरे, संगीता वाघमारे, शकुंतला नेत्रगावकर, बेबीताई कांबळे तसेच महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सुकाणू समितीचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त महार बटालियन व एनसीसी कॅडेट्स यांनी सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यु. डी. गायकवाड यांनी केले तर आभार मिलिंद धावारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महा बुद्ध वंदना सुखानू समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.