सोलापूर- यावर्षी हजला जाणाऱ्या भाविकांचे विमान रवाना झाले. यावेळी भाविकांचे हज कमेटी ऑफ इंडियातर्फे स्वागत करून त्यांना मुंबईवरून मदीना येथे रवाना करण्यात आले.
यावेळी जाईंट सेक्रेटरी सी. पी. बख्शी, हज कमेटी ऑफ इंडियाचे प्रशासन अधिकारी शानवास, उपप्रशासन अधिकारी डॉ. सदाकत अली, नियाज़ अहमद , सऊदी एयरलाइंस अधिकारी तसेच मुंबई एयरपोर्ट अथॉरिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमेटीच्या सदस्यांनी आपल्या जिल्ह्यातून हजला जाणाऱ्या भाविकांसाठी विविध शिबिरे आयोजन केली होती. भावीकांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांना खादीमुल हुज्जाज हज कमिटीच्या पदधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यात सोलापूर जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमिटीचे सदस्य शफीक रचभरे यांचा सन्मान करण्यात आला.