हिंगोली/आय. डी. पठाण
हदगाव विधानसभेतील दोन पहेलवान हिंगोली लोकसभेसाठी आपले भाग्य आजमावण्यासाठी मैदानात उतरले असून मागील विधानसभेच्या निवडणुकीत या दोन पहेलवानांमध्ये टक्कर होऊन तिरंगी लढतीत काँग्रेसचे माधवराव पाटील जरोडेकर हे विजयी झाले होते.
शिवसेनानेते नागेश पाटील आष्टीकर व उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले बाबुराव पाटील कोहळीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून तिरंगी सामन्यात काँग्रेसचा विजय झाला होता. त्यामुळे आता मागील विधानसभेत पराभूत झालेले दोन्ही पहेलवान हिंगोली लोकसभेच्या मैदानात आपले भाग्य आजमावत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने हदगाव येथील काही मतदारांना दोन्ही पहेलवानांबाबत विचारणा केली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नागेश पाटील आष्टीकर हे या लोकसभेत विजयी होतील असा अंदाज वर्तविला.
त्यामुळे जनतेमध्ये दोन्ही पराभूत झालेल्या उमेदवारांत हिंगोली लोकसभेतून मतदार कोणाला लोकसभेत पाठवतील हे मात्र निवडणूक निकाल लागल्यानंतरच सत्य समोर यईल.