21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रहप्तावसुलीच्या आरोपाने महायुतीत ठिणगी

हप्तावसुलीच्या आरोपाने महायुतीत ठिणगी

पुणे : प्रतिनिधी
खासदार बारणे यांच्या लेटर बॉम्बमुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली. तर, दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी वादात उडी घेत खासदार बारणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खासदार बारणे यांनी काळजी करू नये असे म्हणत त्यांना सबुरीचा सल्ला दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या लेटर बॉम्बचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. खासदार बारणे यांना भाजप आमदाराने प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्यावर आरोप झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस हप्तेवसुली करत असल्याचा गंभीर आरोप खासदार बारणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याच्या गृह विभागाला लक्ष्य केल्याने चर्चांना उधाण आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या गृह विभागात असे गैरप्रकार होणार नाहीत असे म्हणत आमदार गोरखे यांनी खासदार बारणे यांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

खासदार बारणे यांनी पत्रात काय म्हटले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृह खाते आहे, असे असून देखील पिंपरी-चिंचवड पोलिस नागरिकांना दाद देत नाहीत, तक्रारी दाखल करून घेत नाहीत आणि हप्तेवसुली करून वरिष्ठांना देतात असे लेखी पत्र देत खासदार बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आणि राज्याच्या गृह विभागाच्या कारभारावर बोट ठेवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR