चाकूर : प्रतिनिधी
अगोदरच खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट,त्यात आडतीवर शेतमालाला हभी भावा पेक्षा कमी भाव मिळत असल्याने त्यामुळे शेतकरीचिंंतातुर झाला आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामात संततधार व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापूस व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाल्याने लागवडीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून भविष्यात काय होणार? यामुळे शेतकरीचिंताग्रस्त झाला आहे.
हंगामात पिके आली असतांना तोंडावरचा घास निसर्गाने पळवला, अशी परिस्थिती मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. निसर्गाकडून क्रूर चेष्टा होत आहे. मायबाप शासनाकडून मात्र तुटपुंजी मदत मिळत आहे. लागवडीचा खर्चही निघत नाही. विमा कंपनीकडून शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली गेली, विमा रक्कम देखील मिळत नाही. काही शेतक-यांंना अनुदान देखील मिळाले नाही. परिणामी शेतक-यांचा कर्जाचा बोजा वाढत आहे. शेतकरी दरवर्षी शेतामध्ये बियाणे, औषधी, खते, लागवडीवर लाखोंचा खर्च करीत असतो. पाऊस वेळेवर नाही म्हणून अनेक वेळा नुकसान झाले. पाऊस अधिक झालाअसंतुलीत शेतीमुळे अनेक वर्षापासून शेतक-यांची आर्थिक स्थिती डगमगली आहे. शासनाची मदत अल्प मिळत असल्याने झालेले नुकसान मात्र भरून निघत नाही.