30.8 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeउद्योगहाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान

हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान

सिंगापूर (शहर) : वृत्तसंस्था
आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची नवी लाट आलेली पाहायला मिळत आहे. सिंगापूर, चीन, थायलंड आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ दिसून येत आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे. ३ मे पर्यंत जवळपास १४,२०० नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत.

गेल्या उन्हाळ्यापासून चीनमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच एप्रिलमध्ये झालेल्या सोंगक्रान फेस्टिव्हलपासून थायलंडमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. सध्या सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 या दोन्ही व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. हे दोन्ही JN.1 स्ट्रेनशी संबंधित आहेत. आरोग्य अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही व्हेरिएंट मिळून दोन तृतीयांशपेक्षा जास्त संक्रमित प्रकरणांसाठी जबाबदार आहेत.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, देशातील लोकसंख्येची इम्युनिटी कमी होत आहे. सध्याचा व्हेरिएंट हा वेगाने पसरत आहे. मात्र साथीच्या काळात आधी आढळलेल्या व्हेरिएंटपेक्षा जास्त गंभीर आजार निर्माण करत आहे असे कोणतेही संकेत नाहीत. डॉक्टर कोरोना व्हायरसच्या या नवीन लाटेला नॉर्मल फ्लू मानत आहेत.

भारताला धोका आहे का?
सध्या भारतात कोरोना व्हायरसचा कोणताही मोठा धोका नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत कोरोनाचे फक्त ९३ रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोरोना साथीच्या नवीन लाटेबाबत कोणतेही संकेत नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR