लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे बहुमताने निवडून आले. राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीवर विश्वास दाखवत सर्व मतदारांनी डॉ. काळगे यांना भरभरून आशीर्वाद दिले. याबद्दल मी मतदार बंधू-भगिनींचे मन:पूर्वक आभार मानतो. आपली साथ, आपले पाठबळ असेच कायम राहील, अशी खात्री आहे. लोकसभेत आपल्या विचारांचा, पक्षाचा उमेदवार नसल्यानेच गेली १० वर्षे लातूरचे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात अडकले होते. पण, आता लातूरच्या प्रगतीला पुन्हा एकदा चालना मिळेल, इथल्या विकासाचा वारसा जपला जाईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.