22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रहिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस

हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस

कालीचरण महाराजांना जरांगेंचे प्रत्युत्तर

जालना : प्रतिनिधी
स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक विधान केले. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, अशा शब्दांत कालीचरण महाराज यांनी टीका केली.

मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरेच सांगितले. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत, हे त्यांचे काम आहे. आरक्षण काय हे शिकवणे त्यांचे काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे? माझ्या आई- बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो, नथ घालतो, असे म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

जरांगेंची कालीचरण महाराजांवर टीका
हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येते तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचे दु:ख कळायचे नाही. तुम्ही पाकिटे घेऊन कीर्तने करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूंत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल, असे म्हणत मनोज जरांगेंनी निशाणा साधला आहे.

आम्ही छत्रपतींचे हिंदुत्व चालवतो. तू कोणते हिंदुत्व चालवतो? कालीचरण हा सपाट दिसतो वरून खालपर्यंत…सरकारने हे असले संत कुठून प्रचाराला आणलेत. हिंदू असूनही का मराठ्यांच्या पोराला मारायला निघालेत? तुला मराठ्यांचा तिरस्कार का आहे? पक्षाला बदनाम करण्यासाठी तू आम्हाला बदनाम करतो का?, असे म्हणत जरांगे यांनी कालीचरण महाराजांची नक्कल केली आहे.

कालीचरण महाराज यांचे विधान
आता एक आंदोलन सुरू झाले होते ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचे. अशी हवा होती त्या आंदोलनाची…अशी हवा.. लाखो लोक मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोक जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आले की, त्यांनी आता जावे कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. या जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत हे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस, असे म्हणत कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR