29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedहिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान दगडफेक

हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान दगडफेक

सोलापुरात राडा, दुकानांचे नुकसान, गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तोडफोडीत दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाषणादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्यांच्यावरही रितसर कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे आणि टी. राजा सिंग यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोलापुरात शनिवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांना आमंत्रित करण्यात आले होते. या दरम्यान सोलापुरात काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.

सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आले आहे. मोर्चाच्या वेळेस पोलिसांनी या परिसरात कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे फुटेज पाहून आणखी आरोपी निश्चित केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

राणे, सिंग यांना नोटीस
दरम्यान, हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी आमदार नितेश राणे आणि टी. राजा सिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावलेली होती अशी माहिती समोर येत आहे. भाषणादरम्यान जर कोणी आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर त्यांच्यावरही रीतसर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसंनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR