16.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमुख्य बातम्याहिजबुल्लाह आक्रमक; इस्राईली डोम असफल

हिजबुल्लाह आक्रमक; इस्राईली डोम असफल

बैरुत : वृत्तसंस्था
पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये स्फोटके लपवून हिजबुल्लाचे कंबरडे मोडणा-या इस्रायलवर हिजबुल्लाने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टिम सपशेल अपयशी ठरली असून नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. इस्रायलवर १०० हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. रविवारी सकाळी जेझरील खो-यात १४० हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अन्य भागांमध्येही हल्ला करण्यात आला.

बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर शुक्रवारी इस्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वोच्च कमांडरच्या अंत्यसंस्कारानंतर हिबुल्लाहने हा हल्ला केला. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सुमारे १३० किलोमीटरची सीमा आहे. हमासमुळे गाझा पट्टी उध्वस्त झाली आहे. आता हिजबुल्लाहमुळे लेबनान हा देश उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

इस्रायलने डागलेल्या रॉकेटमध्ये एक रॉकेट शाळेवर पडले. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. धमक्या आम्हाला थांबवणार नाहीत… आम्ही सर्व लष्करी शक्यतांचा सामना करण्यास तयार आहोत, असे हिजबुल्लाहच्या डेप्युटी कमांडरने म्हटले आहे. इस्रायलबरोबरच्या संघर्षाच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे, असे त्याने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR