27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयहुतात्मा स्मारकावर चालवले बुलडोझर

हुतात्मा स्मारकावर चालवले बुलडोझर

अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेतले फैलावर

लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या मैनपुरी येथील हुतात्मा स्मारकावर बुलडोझर चालवण्यात आले. यानंतर अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारला फैलावर घेत भाजपला इशारा दिला आहे.

मैनपुरीच्या वीर लाल मुनीश यादव यांनी कारगिलमध्ये शत्रूंचा पराभव केला होता. आज त्यांचेच स्मारक जमीनदोस्त करण्याचे धाडस भाजप सरकारने केले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे देशातील सैनिक आणि देशभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.

कारगिल युध्दामध्ये शहीद झालेले जवान मुनीश यादव यांचे मैनपुरी येथे २००० साली बांधलेले स्मारक भाजप सरकारने जमीनदोस्त केले आहे. यामुळे संतापलेल्या अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्यात ते म्हणाले की, देशासाठी बलिदान देणा-या शहीद जवानांची किंमत भाजप सरकार कधीच समजू शकत नाही. इतिहास याला साक्षी आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, जे स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना पाठिंबा देण्याऐवजी वसाहतवादी राज्यकर्त्यांचे डोळे-कान म्हणून वागत आहेत, त्यांना त्यांच्या बलिदानाची किंमत कधीच कळणार नाही, अशी टीकाही अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR