21.5 C
Latur
Friday, August 29, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहुती पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख हल्ल्यात ठार! इस्राईलचा हुतींवर हवाई हल्ला

हुती पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्करप्रमुख हल्ल्यात ठार! इस्राईलचा हुतींवर हवाई हल्ला

सना : वृत्तसंस्था
इस्रायलने येमेनची राजधानी सनामध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हुतींच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली टीव्ही केएएनने येमेनी माध्यमांचा हवाला देत यासंदर्भात वृत्त दिले आहे. या हल्ल्यात हुथी पंतप्रधान गालिब अल-रहावी आणि समूहाचे अनेक लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. हा येमेनच्या हुतीं विरोधातील सर्वात मोठा हल्ला असल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.

येमेनच्या अल-जुम्हुरिया वाहिनीने दलेल्या वृत्तानुसार हुती पंतप्रधान अल-राहवी त्यांच्या अनेक सहका-यांसह एका अपार्टमेंटमध्ये होते. याच वेळी त्यांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या चॅनल-१२ ने दिलेल्या वृत्तानुसार, हुती संरक्षण मंत्री मोहम्मद नासेर अल-अथिफी आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-गमारी हे देखील या हल्ल्यात मारले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र, या तीनही हुथी नेत्यांच्या मृत्यूसंदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

महत्वाचे म्हणजे, हे प्रमुख नेते हुती प्रमुख अल-मलिक हुती यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रसारित भाषण बघत असतानाच हा हल्ला करण्यात आला. सर्वप्रथम हुती-संचालित अल मसिरा टीव्हीने या हल्ल्याची माहिती दिली. यानंतर, संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि आयडीएफनेही हल्ल्याची पुष्टी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR