20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रहेमंत पाटलांचा पत्ता कट, भावना गवळींनाही तिकीट नाहीच!

हेमंत पाटलांचा पत्ता कट, भावना गवळींनाही तिकीट नाहीच!

मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपच्या दबावासमोर नामुष्की झाली आहे. पहिल्या यादीमध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हिंगोली मध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे. हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चर्चेचा मुद्दा झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला आहे. या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे.

भावना गवळींचा पत्ता कट
भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी यांनी सर्वस्व पणाला लावले होते. वर्षा बंगल्यावर येऊन मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसेच फडणवीस यांचीही भेट घेतली होती. फडणवीसांच्या घरी जाण्यापूर्वी भावना गवळी उत्साहात होत्या. परंतु, 25 मिनिटांच्या भेटीनंतर बाहेर पडल्यानंतर भावना गवळी यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. गवळी यांनी आपली गाडी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणात मागवून घेतली आणि तिथूनच त्या गाडीत बसून निघून गेल्या होत्या. तेव्हापासूनच यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR