26.1 C
Latur
Sunday, July 7, 2024
Homeराष्ट्रीयहेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री

हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री

रांची : मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी गुरुवारी झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सुप्रीमो शिबू सोरेन, त्यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ््याला उपस्थित होते.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रे हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती, जी आता खरी ठरली.

संक्तवसुली संचालनालयाने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या ४.५५ एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी ईडीने रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रे आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला. त्यातून त्यांना ३१ जानेवारी २०२४ रोजी अटकही झाली होती. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR