उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील हेर येथे सस्ती अदालतचे आयोजन करण्यात आले होते. सदर सस्ती आदालत मध्ये उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर , गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उपअधीक्षक भूमि अभिलेख किशोरकुमार कोरे, उप अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद लातूर उगिले, वनपरक्षिेत्र अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे उपस्थित होते. यावेळी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेर मंडळचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले तसेच उपस्थित शेतकरी यांना उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी शेत रस्त्याबाबत मार्गदर्शन केले. शेतक-यांनी आपापसात संमतीने व समन्वयाने शेत रस्त्याचा वाद मिटवून घेऊन रस्ता खुला करावा ज्यायोगे शेजारील शेतकरी यांना त्रास होऊ नये. याची दक्षता घेण्याबाबत सूचित केले.
शेत रस्ते केल्याचे फायदे व शेतासाठी रस्ता असण्याचे फायदे याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. आजच्या सस्ती अदालत मध्ये एकूण ६१ वाद प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी १९ प्रकरणात सामंजस्याने जागीच वाद मिटवण्यात आला व रस्ता खुला करण्याबाबत सहमती झाली तहसीलदार राम बोरगावकर यांनी हेर शिवारातील जायमोक्यावर जाऊन एका वादग्रस्त रस्ता च्या कामाचा प्रारंभ त्या ठिकाणी नारळ फोडून करण्यात आला. यावेळी हेर मंडळ विभागातील ग्राम महसूल अधिकारी उळागडे सावन, अनुराधा अलगुले, वडगावे, संतोष पाटील हे उपस्थित होते.