परभणी : जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड येथे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिर दि.२७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिरात मुक्ताई योगाभ्यास व योग उपचार केंद्र मार्फत होमगार्ड प्रशिक्षणार्थीना सतत ५ दिवस योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ४४ होमगार्ड प्रशिक्षणार्थी व निर्देशक वर्ग प्रदीप बलवीर (केंद्रनायक) व प्रताप बागल (सामग्री प्रबंधक अधिकारी), कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी माणिकराव वाडेकर यांनी देखील योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
मुक्ताई योग अभ्यास सोहम ग्रुपचे योग प्रशिक्षक नरेंद्र कदम (योग प्रशिक्षक), क्रांतीताई काळे, डॉ.उमा आहेर, दिपाली देशमुख, रेखा डोमे, संजीवनी भोसले, शिवानी तांदळे गीतांजली मानवते, ऋषिकेश जोशी, अभिजीत शिंदे, हर्षदा अंभोरे इत्यादी योग प्रशिक्षकांनी योग प्रशिक्षण देऊन होमगार्ड सदस्यामध्ये मनशांती स्थैर्य जीवन जगण्याच्या पद्धतीचे व आहार विहार इत्यादी विषय शिकवून होमगार्ड संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण केले. जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व त्यांच्या पत्नी क्रांतीताई काळे यांनी देखील योगाभ्यासाचा पाच दिवस लाभ घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी योग पतंजली फोटोचा हार व दीप प्रज्वलन करून योगाभ्यास सुरुवात केली. मनशांती हॉस्पिटलचे डॉ.प्रताप काळे यांनी माणसाच्या मेंदू कसा कार्य करतो. त्यातून माणसात आनंद कसा निर्माण होतो अथवा द्वेष कसा निर्माण होतो. मेंदूमध्ये तयार होणारे रसायन माणसाच्या शरीराचे स्नायू ताठ अथवा लवचिक कसे होते असे विविध उदाहरणाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना सांगितले. तालुका समादेशक अधिकारी परमेश्वर जवादे, वरिष्ठ पलटणनायक गंगाधर कटारे, बाळासाहेब तनपुरे, पलटणनायक गणेश खुणे व कुलकर्णी यांनी प्रशिक्षण घेऊन शेवटी होमगार्ड बँड पथकाने राज्य गीत वाजून कार्यक्रमाची सांगता केली.