लातूर : प्रतिनिधी
आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी जिल्हयातील २१२० विद्यार्थ्याची दि. १४ फेबु्रवारी रोजी निवड झाली होती. गेल्या १० दिवसात केवळ १२० विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले आहेत. पालकांना आपल्या पाल्यांचे मोफत प्रवेश घेण्यासाठी २४ फेबु्रवारी ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उरलेल्या चार दिवसात २ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानीत २०६ शाळांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी झाली आहे. २०६ शाळेतील २५ टक्के मोफत २ हजार १७३ जागेसाठी ६ हजार ५४५ पालकांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. या आलेल्या आर्जातून मोफत प्रवेशाची सोडत कढण्यात आली. या लॉटरीत २ हजार १२० विद्यार्थ्यांची निवड झाली. यात अहमदपूर तालुक्यातून ११७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. तसेच औसा तालुक्यातून १६९, चाकूर ६४, देवणी ६८, जळकोट २३, लातूर ४६२, लातूर शहर १ मधील १७, लातूर शहर २ मधील ४९६, निलंगा १७३, रेणापूर ४२, शिरूर अनंतपाळ १र्१, तर उदगीर तालुक्यातून ३२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.