22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूर१२५ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शिलाई मशीनचे वाटप

१२५ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शिलाई मशीनचे वाटप

औसा : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.२२) जुलै रोजी औसा येथे १२५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले.  याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी येणा-या काळात महिलांना छोट्या मोठ्या उद्योगातून रोजगार निर्मीतीचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १३३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ याकतपूर येथील शेतकरी विशाल मधुकर मोरे यांच्या शेतात केशर आंबा फळबाग लागवडीतून करण्यात आला तर तांबरवाडी /राजेवाडी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा व वडार समाजाला ८ अ चे वाटप करण्यात आले. तसेच कासारसिरसी मंडळातील विशेष प्राविण्यासह १० वी उत्तीर्ण झालेल्या ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा भुतमुगळी येथे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व घड्याळ देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता,शोभा अभिमन्यू पवार,अ‍ॅड परिक्षीत पवार, जिल्हा कृषी अधिकारी आर टी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे, जयश्री घोडके, कल्पना ढविले, कविता गोरे, समीर डेंग संजय कुलकर्णी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन कवठाळे, मंडळ कृषी अधिकारी विकास लटुरे,बालाजी निकम, सचिन आनसरवडे, याकतपूर सरपंच बालाजी बाडगिरे उपसरपंच महाविर बोळ, तांबरवाडी /राजेवाडी सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच शिवाजी जाधव,सुग्रीव लोंढे, सुधीर लोंढे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR