27.9 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeलातूर१२ वी बोर्ड परीक्षेत शाहू महाविद्यालयाचे उज्­ज्­वल यश

१२ वी बोर्ड परीक्षेत शाहू महाविद्यालयाचे उज्­ज्­वल यश

लातूर : प्रतिनिधी
इयत्ता १२ वी एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल दि. ५ मे रोजी जाहीर झाला. शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्­ज्­वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावर्षी विज्ञान शाखेत एकूण १०८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, यापैकी सर्वच्­या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्­तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १०० टक्­के आहे. लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८९.४६ आहे. या तुलनेत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण १०.४४ टक्­के जास्­त आहे. द्रोणा प्रदिप वीरकपाळे हा विद्यार्थी ९४.८३ टक्­के गुणांसह महाविद्यालयात सर्वप्रथम आला. शिवानंद विष्­णू तिडके याने ९४.५० टक्­के गुण मिळवून द्वितीय तर शिवोहम प्रतापसिंह शिंदे हा विद्यार्थी ९३.५० टक्­के गुणांसह सर्वतृतीय आला आहे. एकूण १५ विद्यार्थ्यांना ९० टक्­के पेक्षा जास्­त गुण मिळाले तर ७६ विद्यार्थ्यांना ८५ टक्­के पेक्षा जास्­त गुण आहेत. तसेच ४३१ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्­य शाखेत एकूण ४५१ विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्­यापैकी ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्­य शाखेचा निकाल ९७.७८ टक्­के आहे. तसेच कला शाखेत २२९ परीक्षाथ्र्­यांपैकी २११ उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ९२.१३ टक्­के आहे. एच.एस.सी. व्­होकेशनल शाखेचा निकाल ८९.६५ टक्­के आहे. वाणिज्­य शाखेत कु. कलंत्री अनुष्­का व कु. सारडा सरस्­वती ९६.१७ टक्­के गुणांसह महाविद्यालयातून सर्वप्रथम आहेत. तसेच सुर्यवंशी विद्या व हिरवे जान्­हवी ९५ टक्­के गुणांसह द्वितीय स्­थानी आहेत. मुंदडा समृध्­दी व कासट निकिता ९३.८३ गुणांसह तृतीय स्­थानी आहेत. वाणिज्­य शाखेतून एकूण ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्­क्­यांपेक्षा जास्­त गुण घेतले आहेत. तसेच १४६ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागीय मंडळाच्­या निकालाच्­या तुलनेत महाविद्यालयाचा वाणिज्­य शाखेचा निकाल ८.३२ टक्­के जास्­त आहे.कला शाखेत भोसले तन्­वी ही विद्यार्थिनी ९३ टक्­के गुण घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम आली आहे. तसेच श्रुती अष्­टेकर ही विद्यार्थिनी ९२.५० टक्­के गुणांसह द्वितीय स्­थानी आहे. तसेच आर्य पवीर्वी ही विद्यार्थिनी ९०.६७ टक्­के गुण घेऊन तृतीय स्­थानी आहे.
 कला शाखेतून ९० टक्­क्­यांपेक्षा जास्­त गुण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्­या ३ आहे, तर ४८ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागीय मंडळाच्­या निकालाच्­या तुलनेत महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल २.६७ टक्­के जास्­त आहे. एच.एस.सी. व्­होकेशनल शाखेतून पठाण मदिहा ही विद्यार्थीनी ७३.३३ टक्­के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. शाहू महाविद्यालयातून १०० पैकी १०० गुण मिळविणारे संस्कृत- ३६, पाली- १७, एएसटी – ५, पुस्­तपालन व लेखाकर्म – ६, रशियन – १ तसेच मत्­स्­यशास्­त्र विषयात २०० पैकी २०० गुण मिळविणारे ५ विद्यार्थी आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध  जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव अ‍ॅड. सुनिल सोनवणे, माजी प्राचार्य डॉ. आर. एल. कावळे व इतर सर्व संस्­थेचे संचालक, शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. शिंदे, सीईटी- सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, पर्यवेक्षक प्रा. जयराज गंगणे व डॉ. भिमरावपाटील, सर्व मुख्­य समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR