लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती, लातूर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरमधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबितरात विद्यार्थी, पालक व प्राध्यापक असे १३० जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजनमोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. शेखर गरड, डॉ. अमर देशमुख, हंसराज जाधव, डॉ. अभय कदम, अॅड. विजय जाधव, अॅड. उदय गवारे, वैभव तळेकर, अविनाश सूर्यवंशी, धनंजय शेळके, शहाजी पवार, प्रमोद साळुंके, महेश साळुंके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्याण सावंत, डॉ. प्रकाश रोडिया, प्रा. चंद्रप्रभा कुलकर्णी, प्रा. विजय गवळी, डॉ. राहुल मोरे, नागेश कांबळे, ओंकार आंबोरे, राजकन्या फावडे, शेख इम्रान आदी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रक्तदान हे जीवनदान आहे. म्हणून अनेक रुग्णांनाचे प्राण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन केले. अॅड. उदय गवारे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यासाठी भाषणातून प्रेरित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी अध्यक्षीय मनोगतमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन ऐतिहासिक घटना पडताळून पहाव्यात व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे, असे म्हणत शिव जन्मोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले. शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन तरुणांनी स्वत: इतिहास अभ्यासून तथ्य शोधले पाहिजे, अशी आशा याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, यांनी व्यक्त केली. डॉ. कल्याण सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर डॉ. राहूल मोरे यांनी आभार मानले.