लातूर : प्रतिनिधी
लायन्स फॅमिली लातूर, लायन्स क्लब पुणे सुप्रीम आणि लायन्स क्लब परभणी मेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट), पोलिओ कॅलिपर्स व क्रचेस वाटप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा सामाजिक उपक्रम पी.व्ही. फिजिक्स क्लासेस, उद्योग भवन, लातूर येथे संपन्न झाला. यावेळी एकूण १४० गरजूंना कृत्रिम हात आणि पायांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एमजेएफ लायन डॉ. गोपाळराव पाटील आणि एमजेएफ लायन डॉ. मनमथ भातांबरे हे माजी जिल्हा राज्यपाल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रकल्प समन्वयक म्हणून लायन्स जगदीश हड्डा व लायन्स एमजीएफ पी विवेकानंद सर आपली भूमिका पार पाडली तसेच लायन्स संजना झमवार, लायन्स सुशील मुंदाडा, एमजेएफ लायन्स अशोक पांचाळ, लायन्स रजनी अंबाडे, लायन्स आकाश अंबाडे, संजय राजुळे, यांचे हा कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी साथ लाभली. प्रकल्प आयोजक म्हणून लायन्स सुधर्शन कंजे, लायन्स शरद मोरे, एमजेएफ लायन्स नागनाथ गित्ते, लायन्स डॉ.अजय नारायणकर, लायन्स राहुल माळवदकर, लायन्स पी. रामकृष्णा, लायन्स रामेश्वर मणियार पुणे सुप्रीम क्लब आणि लायन अरुण (अवी) टाक परभणी मेन क्लब यांचे विशेष योगदान राहिले. हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.