नवी मुंबई : प्रतिनिधी
तळोजा येथील ३२ वर्षीय तरूण अनिकेत नलावडे यांचे ह्रदय, बीपी चक्क १५ मिनिटे बंद पडले होते. मात्र, सुदैवाने रुग्णालयात त्यांचा जीव वाचला आहे. विशेष म्हणजे गाडी चालवताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाला, या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला.
कार चालवताना हार्ट अटॅक आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे हर्ट अटॅक आलेल्या अनिकेत नलावडे यांचे हृदय आणि बीपी 15 मिनिटांपर्यंत बंद राहूनही 32 वर्षीय युवकाचे प्राण वाचले आहेत. तळोजा येथील 32 वर्षीय रहिवाशी अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्याने झालेल्या अपघातात दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला. मात्र,
या अपघातात १५ मिनिटांच्यावर हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद राहून अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचलेला आहे. घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेऊन कार चालवत हॉस्पीटलमध्ये जात होते. पण, कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईकस्वाराला उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.
कारमध्ये अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना व्हाईट लोटस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता त्यांचे हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद झाले होते. जवळपास मृत्युच्या दाढेत अनिकेत नलावडे पोहोचले होते. मात्र, हृदयरोगतज्ञ डॉ. विजय डीसूजा यांनी त्वरीत उपचारकरत पुढील एक तासात अनिकेत नलावडे यांना शुध्दीवर आणून त्यांचे प्राण वाचविले. आत्तापर्यंत ५० हजारांपर्यंत हृदयासंबंधीत शस्त्रक्रिया करणा-या डॉ. विजय डिसूजा यांच्यासाठी, ही घटना चमत्कारीक होती.