29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूर१६७२ शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले

१६७२ शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले

लातूर : प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पात्र झालेले १ हजार ६७२ शेतकरी प्रोत्साहनपर लाभापासून अद्याप दूरच आहेत. या शेतक-यांचे बँकेशी आधार प्रामाणीकरण न झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नाही. या शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ घेण्यासाठी शासनाने दि. ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ही शेतक-यांसाठी शेवटची संधी असणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी १ लाख ८४ हजार ६९९ शेतक-या पैकी १ लाख ३१ हजार ९२२ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ३३६ शेतक-यांनी आधार बँकेशी लिंंक केले आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार ७८ शेतक-यांच्या खात्यावर ४१० कोटी ४७ लाख रूपये कर्ज फेड केलेल्या रक्कमेच्या आधारे डीबीटीव्द्वारे वर्ग झाले आहेत.
प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणासाठी टॅब उपलब्ध करुन दिला आहे. या मुदतीत १ हजार ६७२ शेतक-यांना आधार प्रामाणीकरण करून घ्यावे लागणार आहे.  योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी ज्या बँकेचे आहेत. त्या बँकेकडे, तसेच गटसचिवांच्याकडे शेतक-यांच्या नावाच्या याद्या आधार प्रामाणीकरणासाठी पाठवल्या आहेत. लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तसे बँकेला कळवावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR