34.8 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमुख्य बातम्या१६ विधेयकांसह महाकुंभ गाजणार

१६ विधेयकांसह महाकुंभ गाजणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (०१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून १६ महत्त्वाची विधेयकेही सरकार सादर केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पीय अधिवशनात महाकुंभातील दुर्घटनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासह १६ महत्त्वाची विधेयके सरकारकडून मांडली जाणार आहेत. ज्यामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ चाही समावेश आहे. याशिवाय बँकिंग (सुधारणा) विधेयक, रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, तेल क्षेत्र (नियमन आणि विकास) दुरुस्ती विधेयक, बॉयलर बिल, गोवा राज्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधीत्वाचे पुनर्संयोजन विधेयक, वक्फ (दुरुस्ती) विधेयक, मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, बिल ऑफ लॅडिंग बिल, सी बिल, कोस्टल शिपिंग बिल, व्यापारी शिपिंग बिल सर्व २०२४), वित्त विधेयक, एअरक्राफ्ट आर्टिकल बिल, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक आणि इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल (सर्व २०२५).

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR