25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूर१७ गुन्ह्यातील २४ मोटारसायकली जप्त

१७ गुन्ह्यातील २४ मोटारसायकली जप्त

लातूर : प्रतिनिधी
लातूर, धाराशिव व पुणे यासह १७ ठिकाणाहून चोरी केलेल्या २४ मोटारसायकलीसह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.  विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषत: मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू होते. त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना १० फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अमोल नागरवाड याने चोरलेल्या मोटारसायकली त्याचे राहते घरासमोर लपवून ठेवलेल्या आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने १० फेब्रुवारी रोजी सदर पथक तात्काळ अहमदपूर तालुक्यातील मौजे थोरलेवाडी येथे पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या अमोल तेजराव नागरवाड, वय २५ वर्ष याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल ह्या लातूर, धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने चोरलेल्या मोटरसायकल वरून सदरच्या मोटरसायकली ह्या लातूर पुणे व धाराशिव जिल्ह्यातून चोरी  केलेल्या एकूण २४ मोटरसायकली ज्याची किंमत ८ लाख २० हजार रुपये असा असून त्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे चाकूर येथील ४, पोलीस ठाणे शिरूर अनपाळ येथील ३ मोटरसायकल, पोलीस ठाणे रेणापूर, देवणी, निलंगा, विवेकानंद, गांधी चौक, अहमदपूर येथील प्रत्येकी १ मोटरसायकल तर पुणे जिल्ह्यातील ३ व धाराशिव जिल्ह्यातील १ असे एकूण १७ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरित सात मोटारसायकल संदर्भात तपास सुरू आहे. नमूद आरोप पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आला असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरीपोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्ष  विश्वंभर पल्लेवाड यांच नेतृत्वातील पथका मधील उपनिरीक्षक संजय भोसले, अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे, राजेश कंचे तुळशीराम बरुरे, सुधीर कोळस सिद्धेश्वर जाधव, युवराज गिरी, मनोज खोसे, गोविंद भोसले, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR