मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलचे सामने आता १७ मेपासून सुरु होणार आहेत आणि अंतिम सामना ३ जूनला होणार आहे. बीसीसीआयने आता आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ला केला होता, त्यानंतर आयपीएलचा पंजाब आणि दिल्लीचा सामना सुरु होता. पण काही वेळातच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मैदानात कोणताही गोंधळ होणार नाही, याची दखल बीसीसीआयने घेतली आणि मोठा अपघात टाळला. त्यानंतर आयपीएल एका सामन्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने आयपीएल सुरु होत आहे आणि त्याचे वेळापत्रक आता समोर आले आहे. आयपीएलच्या शिल्लक लढतींचा कार्यक्रम तयार झाला आहे. तो सर्व संघांना पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. ती उद्या सकाळपर्यंत येईल आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर होईल, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या लीगचे पुनरागमन होताना लढतीची ठिकाणे मर्यादित असतील असेही संकेत मिळाले होते. त्यानुसारच आता हे सामने होणार आहेत.