लातूर : प्रतिनिधी
अनेक अडचणी पार करीत संघर्षाला तोंड देत घर आणि नौकरी ही जबाबदारी पेलणे सोपे काम नसते,ते तुम्ही यशस्वीपणे करीत आहात या अर्थाने काळाच्या कसोटीवर स्वतास सिध्द केलेल्या तुम्ही स्वंयसिध्दा आहात. इतरांसाठी तुम्ही धावता झिजता पण स्वतासाठीही वेळ काढा तणावमुक्त अन आनंदी रहाङ्घङ्घअसा आपुलकीचा सल्ला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शहर स्वच्छतेची धुरा वाहणा-या कष्टकरी भगिणींना दि. १८ मार्च रोजी दिला. निमित्त होते राज प्रतिष्ठान व मित्रमंडळाच्या वतीने मनपा महिला सफाई कर्मचारी व महिला होमगार्डसना करण्यात आलेल्या साडी वाटपाचे. यावेळी १८८ महिलांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास लातूर महानगरपालीकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसुळे, लातूर आएएमएचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. विमल डोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुमित्रा तांबारे, अभिजीत देशमुख, हंसराज जाधव, डॉ. हर्षवर्धन राऊत, धनंजय शेळके, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. मंजुषा कुलकर्णी, सुरेखा गरड, डॉ. श्वेता काटकर, रमाकांत पिडगे, कलीम शेख, विजयकुमार आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्वांना टीबी मुक्त भारतची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी म्हणाल्या सर्वांची काळजी करताना स्वताकडे लक्ष देण्याचा स्त्रियांना विसर पडतो. त्यामुळे शारिरीक तसेच मानसिक आरोग्य बिघडते. असे होऊ देऊ नका. चाला, फिरा, आवडी जोपासा मैत्रिणींशी गप्पा मारा, व्यक्त व्हा असा आपुलकीचा सल्ला जिल्हाधिका-यांनी दिला व त्यांच्याशी त्यांनी मनमोकळा संवादही साधला. प्रास्ताविकात डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी केले. या कार्यक्रमात १०८ महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व ७८ महिलांचे चेस्ट एक्सरे काढून गरजूंना औषधे देण्यात आली. सुत्रसंचालन किरण चोटे यांनी केले. आभार डॉ. शुभांगी राऊत यांनी मानले.