21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूर१९६७ पूर्वीच्­या देवी आजाराच्­या लसीकरणाच्­या नोंदी सादर करा 

१९६७ पूर्वीच्­या देवी आजाराच्­या लसीकरणाच्­या नोंदी सादर करा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्­यात येते की, लातूर जिल्­हा अंतर्गत कुणबी-मराठा, मराठा-कुणबी कुणबी जात प्रमाणपत्र देण्­याची कार्यपद्धती वि­हीत करण्­यासाठी पुर्वीचे अभिलेख उपलब्­ध होणाच्­या दृष्टिकोनातून पडताळणी करणे सुरु आहे. लातूर शहरातील ज्या नागरीकांकडे १९६७ पुर्वीच्या देवी आजाराच्या लसीकरणाच्या नोंदी असतील तर त्या सादर कराव्यात, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
सन १९६७ पुर्वीच्­या कालावधीतील देवी किंवा साथरोगाच्­या झालेल्या लसीकरणाची आपल्­या व आपल्­या पुर्वजांचे नोंदी असलेले अभिलेखे, दस्­तावेज, कागदपत्र उपलब्­ध असल्­यास किंवा आपणास त्­या काळातील रेकॉर्डबाबत कांही माहिती असल्­यास संबंधीत नागरीक, तत्­कालीन सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी त्­यांच्­या छायांकीत प्रती आरोग्­य अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी, पंडित जवाहरलाल नेहरु रुग्­णालय, पटेल चौक (मनपा दवाखाना), लातूर येथे जमा करावी, असे आवाहन मनपा आयुक्­त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR