लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार ता. उदगीर येथील साखर कारखान्याने या हंगामात विक्रमी गाळप करुन शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन केले आहे. या हंगामातील ऊत्पादीत १ लाख ७७ हजार ५५१किं्वटल साखर पोत्याचे पूजन चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १८ डिसेंबर रोजी या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. साखर पोते पुजन कार्यक्रमास व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक ए. आर. पवार संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, रणजित पाटील, अनंत बारबोले, अमृत जाधव, सुर्यकांत सुडे, गोविंद डुरे, सुभाष माने, संजय पाटील खंडापुरकर, ज्ञानोबा पडीले निमंत्रीत संचालक सर्वश्री मनथप्पा किडे, मारोती पांडे, गोडभरले, उपसभापती प्रिती भोसले, जिल्हा बँकेचे संचालक लक्ष्मीबाई भोसले, विजय निदुरे, पंडित ढगे, राजेंद्र पाटील, विनोबा पाटील, संतोष तिडके आदी उपस्थित होते.
अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे कौतुक
कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी चांगली पुर्वतयारी करण्यात आली होती. गळीत हंगामात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व वाहतूक, तोडणी आणि कारखाना अंतर्गत यंत्रण सज्ज करुन कारखाना सुरु केला. सर्व यंत्रणांचा आणि तांत्रीक कार्यक्षमतेचा चांगला वापर करुन कमी वेळेत विक्रमी गाळप केले. या हंगामात एक दिवसात सर्वांधिक ऊसाचे गाळप करण्याचा दोन वेळा विक्रम केला. शेतक-यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप करुन साखर ऊताराही चांगला ठेवला या बद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन करुन हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या अनुषंगाने याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, वर्क्स मॅनेजर अजय कोळगे, चिफ अकौंटंट ओमप्रकाश चांडक, चिफ केमिस्ट भाऊसाहेब खरात, मुख्य शेतकी अधिकारी देविदास मोकाशे यांच्यासह खाते प्रमुख, विभाग प्रमुख आदीचा सत्कार कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांच्या हस्ते करुन सर्वांचे अभिनंदन केले. मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उदगीर, जळकोट, देवणी या भागातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांंच्या उसाचे गाळप वेळेवर केले जात आहे. या कारखान्याकडून ऊस उत्पादकांच्या ऊसाला चांगला ऊसदर देखील देण्यात येत आहे. या हंगामात ऊसउत्पादक शेतक-यांचा नोंद व बिगर नोंद ऊसाचे गाळप पूर्ण केले जाईल तरी ऊसउत्पादक शेतकरी यांनी काळजी करु नये, असे आवाहन कारखान्याचे वतीने करण्यात आले.
यंदा पाऊस अपूरा व अनियमीत झाला. ऊसाची वाढ योग्य झाली नाही, ऊस लवकर पक्व झाला नाही. यामुळे यंदाच्या वर्षीचे ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी होईल असे दिसत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने आपल्या परिसरातील नोंद झालेल्या ऊसाची ऊसतोड वेळेत होईल, याची काळजी घेतली जात आहे. याकरीता कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादकांनी आपला ऊस याच कारखान्याला गाळपास दयावा असे आवाहन व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली तोडार ता. उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.
यंदा पाऊस अपूरा व अनियमीत झाला आहे. हंगाम सुरु होइपर्यंत ऊसाची वाढ योग्य झाली नाही, ऊस लवकर पक्व झाला नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील कमी ऊस उपलब्धतेच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या वर्षीचे ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. यातच देशातील अन्य राज्यातील साखर कारखाने आक्टोबर महिन्यात सुरु झाले. मात्र महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरु झाला. कारखान्याचा गळीत हंगाम किमान १५० दिवस गाळप हंगाम सुरु राहिला, तर कारखान्यांचे अर्थकारण चांगले राहते. या वर्षी फक्त्त उसावर गाळप हंगाम अवलंबून राहिला, तर १०० दिवसांतच हंगाम संपेल असे दिसत आहे. याकरीता उपलब्ध ऊसातून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्यासाठी ऊसतोडणी, ऊसवाहतूक, कारखाना अंतर्गत सर्व यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने चालवून, नियोजन करून गळीत हंगाम पूर्ण कार्यक्षमतेने चालवीला जात आहे.
गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस गाळपात विक्रम करुन या हंगामातील १ लाख ७७ हजार ५५१किं्वटल साखर पोत्याचे उत्पादीत केल्या बद्दल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे आधिकारी, कर्मचारी वर्ग, वाहतूक ठेकेदार, तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वांचे अभिनंदन केले आहे.