24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणी२२८० शेतक-यांना मिळणार पिक विम्याचे २ कोटी ६० लक्ष रुपये

२२८० शेतक-यांना मिळणार पिक विम्याचे २ कोटी ६० लक्ष रुपये

जिंतूर : तालूक्यातील वस्सा परिसरातील शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वस्सा शाखेतून खरीप २०२३ मधील सोयाबीन पिक विम्याचे वाटप दि.१६ जुलै पासून सुरु करण्यात आले आहे. वस्सा परीसरातील २२८० शेतक-यांना पिक विम्याचे २ कोटी ६० लक्ष रूपये बँकेस प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप सुरू झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वस्सा परिसरातील बोर्डी, लिंबाळा, नागनगाव व स्थानिक वस्सा परिसरातील २२८० शेतक-यांना सोयाबीन पिक विम्याचे २ कोटी ६० लक्ष रुपये बँकेस प्राप्त झाले आहेत. मंगळवार पासून शेतक-यांनी विम्याचे पैसे काढण्यासाठी बँकेत तोबा गर्दी केली होती. ज्यामुळे कर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागली.

हे लक्षात घेऊन सर्व शेतक-यांनी विम्याचे पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करता एटीएम सुविधेचा लाभ घ्यावा व गाव व वार निहाय विमा वाटपास सहकार्य करण्याचे आवाहन बॅकेच्या वतीने करण्यात आले आहे. विम्याचे शेतक-यांना शांततेत व सुरळीतपणे वाटप करण्यासाठी शाखाधिकारी अंबादास ढोकर, तपासणीस गजानन देशमुख, अच्यूत देशमुख, सचिव ज्ञानेश्वर राऊत, नारायण आव्हाड, शिवानंद कंठाळे आदी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR