लातूर : प्रतिनिधी
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातील बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या निदणीय घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळ अर्ल्टमोडवर आहे. राज्यभरातील महामंडळाच्या विभागांना सूचनांवर सूचना देणे सुरु आहे. त्यात लातूर विभागालाही असंख्य सूचना आलेल्या आहेत. प्रवाशांच्या सूरक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. लातूर जिल्ह्यात २२ बसस्थानके आहेत. या सर्वच बसस्थानकांवर पोलिसांची नेमणुक करण्यासंदर्भाने पत्रव्यवहार झाला असून येत्या दोन-तीन दिवसांत पोलिसांची नेमणुक होईल, असे लातूरचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सांगीतले.
राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात लातूर, औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर हे पाच आगार आहेत. या पाच आगारांमध्ये ४५० एस. टी. बसेस असून पावणे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्यात व्यापार, शिक्षण आणि उत्तमदर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे राज्यभारातन्ूाच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातूनही प्रवासी मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात ये-जा करीत आसतात. त्यामुळे जिल्ह्यातील २२ बसस्थानकात प्रवाशांची दिवसरात्र वर्दळ असते. बसस्थानकात प्रवाशांना हव्या त्या प्रमाणात सुविधा मिळत नसतील परंतू, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळेच गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये बसस्थानकात अथवा मुक्कामी बसमध्ये एकही गैरकृत्य घडलेले नाही. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. लातूर शहरातील बसस्थानक क्रमांक १, २ वर सुरक्षा रक्षक नेमले आहेत. सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे.
मी स्वत: आणि इतर अधिकारी अचानक बसस्थानकाला भेट देऊन तेथील प्रवाशांच्या सुरक्षेविषयी काही त्रुटी आहेत काय? याची पाहणी करुन त्या त्रुटी तत्काळ दुर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बस डेपोमध्ये तीन उच्च पदस्त अधिकारी कायमस्वरुपी नेमले आहत्ो. जिल्ह्यातील २२ बसस्थानकांत पोलिसांची नेमणुक करण्याबाबत त्या त्या पोलीस निरीक्षकांशी पत्रव्यवहार झालेला आहे. प्रत्येक्ष भेट देऊनी सांगण्यात आले. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत पोलिसांची नेमणुक होईल. सर्वच बसस्थानकात पोलीस चौकी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बसस्थाकन, डेपोच्या परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक जानराव यांनी दिली.