28.7 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeमहाराष्ट्र२३ वर्षीय शिक्षिकेनेच केला पतीचा खून

२३ वर्षीय शिक्षिकेनेच केला पतीचा खून

हत्येसाठी बनवला होता विद्यार्थ्यांचा ग्रुप यवतमाळमध्ये खळबळ

यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळमध्ये धक्कादायक घटना उघड झाली आहे. दारूड्या नव-याला संपवण्यासाठी २३ वर्षीय शिक्षिकेने मुलांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप केला होता. नव-याला बनाना मिल्क शेकमधून विष देऊन जीव घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात फेकले. असा खुलासा चौसाळा जंगलातील अज्ञात मृतदेह प्रकरणी झाला आहे. यवतमाळलगत असलेल्या चौसाळा जंगल परिसरातील किटाकापरा परिसरात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली. या प्रकरणाच्या तपासात शर्टच्या तुकड्यावरून खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच मद्यपी पतीला बनाना शेकमधून विष दिले, त्यानंतर तो ठार होताच शिकवणीस येणा-या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात मृतदेह फेकला. शिवाय दुस-या दिवशी पुन्हा तिथे जात पेट्रोल ओतून पेटवून दिले. ही बाब पुढे येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने आरोपी शिक्षिकेला अटक करीत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
शंतनू अरविंद देशमुख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निधी शंतनू देशमुख असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. ते दोघेही यवतमाळच्या सुयोगनगरात वास्तव्याला होते. निधी ही एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका तर शंतनू हा तिथे शिक्षक होता. वर्षभरापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर शंतनूला दारूचे व्यसन जडले. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईलमधील तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, मारहाणही करायचा. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचे ठरविले.

१३ मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हीडीओ पाहिला. त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केले. त्यानंतर रात्री पती शंतनू दारूच्या नशेत घरी येताच त्याला बनाना शेकमध्ये विष मिसळून दिले. ते पिताच शंतनू हा काही क्षणातच जागीच ठार झाला. त्यानंतर तिने ही बाब शिकवणीला येणा-या तीन विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांना भावनिक करीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. दोन विधी संघर्ष विद्यार्थ्यांनी दुचाकीने शंतनूचा मृतदेह चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला. त्यानंतर तिने पोलिसांच्या भीतीने दुस-या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळा जंगल गाठून मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR