२४ तासांत भूकंपाचे दोन लागोपाठ धक्के

हिंगोली : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पहाटे १. २० वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर सकाळी १०.१४ वाजता ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना भूकंपापूर्वी, भूकंपाच्या वेळी आणि भूकंपानंतर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. घरांचे भूकंपरोधक बांधकाम करणे, जड वस्तू सुरक्षितपणे बसविणे, आपत्कालीन वस्तुसंच तयार ठेवणे तसेच कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क व स्थलांतर आराखडा तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भूकंपाच्या वेळी शांत राहून मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आसरा घ्यावा, खिडक्या, आरसे व जड वस्तूंपासून दूर राहावे, लिफ्टचा वापर टाळावा आणि कंपन थांबल्यानंतरच सुरक्षितपणे बाहेर पडावे. तसेच खुल्या जागेत असल्यास इमारती, झाडे, विजेचे खांब व तारा यांच्यापासून दूर राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपानंतर मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये प्रवेश करू नये, आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहावे. अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01

Latest news