लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व पात्र शाळांना १८ मार्च पर्यत शाळांना ऑनलाईन नोंदणी करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. शाळांना नोंदणी करण्यासाठी दि. २२ मार्च पर्यंत मुदतवाढ दिली असून १ हजार ६१० शाळांची नोंदणी झाली आहे. उर्वरीत शाळांना दोन दिवसात नोंदणी करावी लागणार आह
े.
२५ टक्के मोफत प्रवेशासाठी पूर्वी विनाअनुदानीत, स्वंयअर्थसहायी शाळांचा समावेश होता. मात्र या वर्षापासून प्रथमताच अनुदानित, खाजगी, शासकीय शाळांचाही नोंदणीसाठी समावेश करण्यात आल्याने १ हजार ११ शाळांच्या मुख्याध्यापकांनी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी १ हजार ६१० शाळांची गटशिक्षणाधिकारी पडताळणी केली आहे. तसेच आणखी १०१ नोंदणी अर्ज पडताळणीसाठी गटविकास अधिकारी स्तरावर आले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार महानगरपालिका शाळा, नगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत शाळा, फैन्टीमेट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिका शाळा (अर्थसहायी), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खाजगी अनुदानिन, स्वंषअर्थसहाष्यीन शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता लातूर जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी दि. ६ ते १८ मार्च हा कालावधी दिला होता. सदर कालावधीत नोंदणी प्रक्रीया न झाल्याने दि. २२ मार्च पर्यंत शिक्षण विभागाने मुदत वाढ दिली आहे.