22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीय२८ ते ३० जुलैदरम्यान राष्ट्रपती राज्य दौ-यावर

२८ ते ३० जुलैदरम्यान राष्ट्रपती राज्य दौ-यावर

लातूर, नांदेड जिल्ह्यातही हजेरी लावणार
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौ-यावर येणार असून त्या कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत पुणे व मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांत आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. २८ ते ३० जुलैदरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार आहेत. या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचीही उपस्थिती राहणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जुलैला कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर लिज्जत पापड कंपनीच्या गोल्डन जुबिली वर्षानिमित्त वारणानगर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दि. २९ जुलै रोजी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभात उपस्थित राहतील. त्यानंतर लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत येणार असून, ३० जुलै रोजी राष्ट्रपती नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या उदगीर येथे येणार असून, बुद्ध विहाराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR