23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार

३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण चर्चेत असतानाच आता पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नालासोपारा हादरून गेला आहे. पीडित महिलेवर तीन नराधमांनी बलात्कार केला आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, नालासोपा-यातील आचोळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या अत्याचार प्रकरणातील आरोपी नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR