मुंबई : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी- हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना दंड ठोठावला आहे. निर्देशांच्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळासह तीन संस्थांना दंड ठोठावला आहे.
आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेडवर ३.५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने गोदरेज हाऊसिंगला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडवर ५ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, नियमांंच्या पालनातील त्रुटींमुळे दंड आकारण्यात आला आहे आणि कंपन्यांच्या कोणत्याही व्यवहार किंवा करारावर परिणाम करण्याचा रिझर्व्ह बँकेचा हेतू नाही. गेल्या आठवड्यात युको बँकेला दंड ठोठावण्यात आला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू खाते उघडणे, ठेवींवर व्याज दर आणि फसवणूक वर्गीकरण (दंड) यासह काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल यूको बँकेला २.६८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडला ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल २.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला.