26.6 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeराष्ट्रीय३ वर्षात ५ लाखाहून अधिक टेक्नोसॅव्ही तरुण बेरोजगार!

३ वर्षात ५ लाखाहून अधिक टेक्नोसॅव्ही तरुण बेरोजगार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
खर्च कमी करण्याच्या उद्देशाने टेक कंपन्यांनी या वर्षात २३,१५४ कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. उत्पन्न घटल्याने कंपन्यांना खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करावी लागत आहे. २०२३ मध्ये कंपन्यांनी २६,४,२२ कर्मचा-यांची कपात केली तर २०२२ ते २०२४ या काळात तब्बल ५,८१,९६१ लोकांना हातातील काम गमवावे लागले.
कर्मचारी कपातीवर नजर ठेवणा-या ‘लेऑफ्स डॉट एफवायआय’ या संस्थेनुसार, यंदाच्या कपातीची सुरुवात ६ जानेवारीपासून झाली. सुरुवातीला इस्रायलच्या सोलरएज कंपनीने ४०० जणांना कमी केलं. ओला इलेक्ट्रिकने भारतात १ हजार कर्मचा-यांना कामावरून काढलं. मेटाने यंदा आतापर्यंत सर्वाधिक ३,६०० लोकांना नोकरीवरून कमी केलं.
कंपनी                            कर्मचारी संख्या
मेटा                                 ३,६००
एचपीई                              २,५००
एचपी                                २,०००
वर्क डे                               १,७५०
ऑटो डेस्क                          १,३५०
ओला इलेक्ट्रिक                     १,०००
ब्लू ओरिजिन                        १,०००
क्रूझ                                 १,०००
सेल्सफोर्स                           १,०००
मार्च महिन्याच्या अखेरीस मॉर्गन स्टॅन्ली सुमारे २,००० कर्मचा-यांना नोकरीतून काढण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार खर्च कमी करण्याबरोबरच कंपनी एआय आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. अमेझॉननेदेखील १४ हजार व्यवस्थापकांना नोकरीतून काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीला दरवर्षी २.१ अब्ज डॉलर ते ३.६ अब्ज डॉलरची बचत होईल.
एआयमुळे दबाव वाढला
एआयमुळे कर्मचा-यांवर अधिक चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, चांगली कामगिरी नसलेल्यांना कामावरून काढले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR