27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्र४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मागे

४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मागे

अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठी अपडेट आहे. पडताळणीच्या भीतीने सुमारे हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. योजनेचा लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, महायुती सरकारच्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणीपूर्वी ४ हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.

लाडक्या बहिणीच अर्ज मागे घेत असल्याचा सरकारकडून दावा करण्यात येत असला तरी यापूर्वी हप्ता जमा केलेल्या बहिणींवर सरकारी भावाचे प्रेम अचानक कमी कसे झाले, असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.

या योजनेच्या अर्जांची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे ४ हजार महिलांनी आपले अर्ज या योजनेतून मागे घेतले आहेत. पैसे परत करावे लागतील या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. पात्रता निकषात न बसणा-या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीणसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते, मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली.
पडताळणी सुरू झाल्यावर आपण अपात्र ठरलो तर मिळालेले पैसे परत द्यावे लागतील, अशी भीती महिलांच्या मनात आहे.

त्यामुळेच आता अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. आम्हाला या योजनेचे पैसे नको, योजनेचे पैसे थांबवण्याची विनंती महिलांनी केली असून असे अनेक अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.

लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याचीही चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आता यावर सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही,असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR