मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडमधून एक गुडन्यूज येत आहे. खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अरबाज खानची पत्नी शूराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शूरा आणि अरबाज आईबाबा झाले आहेत. शनिवारी(४ ऑक्टोबर) शूराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शूराची डिलिव्हरी झाली. शूरा आणि अरबाजला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. शूराला कन्यारत्न झाल्याने खान कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
काही महिन्यांपूर्वीच अरबाज आणि शूराने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तर नुकतंच शूराचं बेबी शॉवरही पार पडले होते. आता त्यांना कन्यारत्न झालं आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. शूराने अरबाज आणि तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. तर अरबाज ५९व्या वर्षी दुस-यांदा बाबा झाला आहे.
अरबाजने शूरासोबत २०२३ मध्ये निकाह केला होता. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे. अरबाज खान ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची आहे. अरबाजचे हे दुसरे लग्न आहे. त्याने मलायकासोबत १९९८ मध्ये संसार थाटला होता. पण २०१७मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्याला २२ वर्षांचा अरहान हा मुलगादेखील आहे.