लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामातील ५ लाख ५१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २० जानेवारी २५ रोजी करण्यात आले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
कारखाना हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालक मंडळ, प्रशासन, तोडणी-वाहतूक यंत्रणेची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे. चालू हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या हंगामात ५९ व्या गाळप हंगाम दिवसात आज अखेर २ लाख ५५ हजार ३०० मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन २ लाख ७८ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामातील ५ लाख ५१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे पूजन सोमवार दि. २० जानेवारी २५ रोजी दुपारी करण्यात आले. त्यावेळी रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी, कारखान्याच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजन करून हा हंगाम यशस्वीपणे पार पाडला आहे. यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढून शेतक-यांना देखील चांगला भाव मिळण्यास मदत होईल असे सांगीतले. हंगामातील कामगिरी बददल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, वाहतुक-तोडणी ठेकेदार यांचे अभिनंदन केले. पुढील राहीलेल्या हंगाम दिवसातही अशाच प्रकारे काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, अमर मोरे, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, रामदास राऊत, सुभाष माने, ज्ञानोबा पडीले यांच्यासह अधिकारी, कामगार उपस्थित होते.