27.2 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeलातूर५ वर्षांत वीज पडून, पुरात वाहून ६० व्यक्तींचा मृत्यू

५ वर्षांत वीज पडून, पुरात वाहून ६० व्यक्तींचा मृत्यू

लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात सोमवार दि. १९ मे रोजी मध्यरात्रीनंतर सर्वदुर मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरुच आहे. त्यातच वीजा पडण्याचे मोठे आव्हान आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याच्या घटना घडतात. सन २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत लातूर जिल्ह्यात पुरात वाहून व वीज पडून ६० व्यक्तीचा मृत्यू झाला तर याच पाच वर्षात पुरात वाहून व वीज पडून ४८९ जनावरे दगावली आहेत. गेल्या आठवडाभरात लातूर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकुळ घातला आहे.
लातूर जिल्ह्यात साधरणत: एप्रिल ते जूनच्या काळात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. वीज पडण्याच्या घडना या प्रामुख्याने दुपारनंतर घडतात. निलंगा तालुक्यातील मौजे अनसरवाडा येथील शेतकरी दत्तात्रय गुंडाजी माने यांची गाय अंदाजे पहाटे ४ वाजता वीज पडून मयत झाली आहे. चाकुर तालुक्यातील मांडूरकी येथील सुभाष विठ्ठल शिंदे यांचा एक एक बैल वीज पडून दगावला आहे. दि. १८ मे रोजी रेणापुर तालुक्यातील इंदरठाणा येथील गट नंबर १९ मध्ये जमीन मालक शेख रऊफ खय्यूम पटेल यांचा शेतातील सालगडी गुणाजी किसन कदम वय ६५ वर्ष यांचा अंदाजे दुपारी ३.१० वाजता शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. याच दिवशी चाकुर तालुक्यातील मौजे येलमवाडी येथील निळकंठ धोंडिबा वाघे ४  वाजता झालेल्या वादळी वा-यासह पावसात वीज पडून म्हैस दगावली आहे.
दि. १९ मे रोजी जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील तानाजी रामदास पवार यांच्या  शेतातमध्ये म्हैस बांधलेली होती. अंदाजे ८.३० वाजता अवकाळी पाऊस चालू असताना वीज पडून म्हैस दगावली आहे. निलंगा तालुक्यातील मौजे बामणी  येथे सदाशिव रामकिशन जाधव यांची गाय अंदाजे ६.०० वाजता वीज पडून मयत झाली. उदगीर तालुक्यातील हाळी येथील अमोल अंगदराव भोसले व नंदकिशोर अंगदराव भोसले यांची दोन म्हैस शेतामध्ये वीज पडून मयत झाली आहे. जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील केरबा विठ्ठल केंद्र यांच्या शेतात गाय बांधलेली होती. अंदाजे ८.३० वाजता अवकाळी पाऊस चालू असताना वीज पडून गाय दगावली आहे. औसा तालुक्यातील मौजे शिंदाळा येथील रहिवासी प्रभू शंकर जाधव यांची म्हेस सेलू शिवारात दि. १८ मे रोजी सायंकाळी वीज पडून म्हेस मृत्यूमुखी पडली आहे. लातूर तालुक्यातील मौजे खुलगापुर येथील  विनायक महादु सोनवणे यांची  म्हैस दि. १९ मे रोजी रात्री २ च्या सुमारास वीज पडून मृत्युमुखी पडली.
लातूर तालुक्यातील मौजे शिऊर येथील धोंडीराम रामधन जाधव यांची म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडली. निलंगा तालुक्यातील धानोरा येथील विलास पांडुरंग सूर्यवंशी यांच्या सहा शेळ्या वीज पडून दगावले. याच तालुक्यातील शेडोळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर बब्रुवान धुमाळ यांची म्हैस दि. १९ मे रोजी वीज पडून मयत झाली आहे. मौजे हालसी तु. येथील वामन रामराव सावरे यांच्या दोन म्हशी वीज पडून मयत झाल्या आहेत. मौजे  अंबुलगा बु. येथील बंकट राजाराम  सूर्यवंशी यांच्या बैल वीज पडून मयत झाला आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील महेबुब बाशासाब मुजेवार यांची एक वागार विज पडून मरण पावली. उदगीर तालुक्यामध्ये मौ लोहारा येथेह्याीज पडून वसंत सोनटक्के यांची गाय मयत झाली आहे. निलंगा तालुक्यातील मौ. तळीखेड निवृती सुर्यभान मुंगनाळे यांची गाय वीज पडून मयत झाली आहे. याच तालुक्यातील मौ. टाकळी येथील शेतकरी नामदेव यलनरेड्डी नरहरे यांचे शेतात वीज पडून गाय मयत झाली आहे. औसा तालुक्यातील मौ. एरंडी येथील बालकिशन बाबुराव चलवाड यांची दि. १९ मे रोजी रात्री झालेल्या पावसात वीज पडून एक गाय मरण पावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR