26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमुख्य बातम्या६,००० वर्षांपूर्वीच्या सुर्यग्रहणाचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात!

६,००० वर्षांपूर्वीच्या सुर्यग्रहणाचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात!

स्टडी जर्नल । जपानी-भारतीयाचे संशोधन; वेदांमध्ये धार्मिक, अवकाश दर्शनाचे सांकेतिक उल्लेख

टोकियो : वृत्तसंस्था
जगातल्या सर्वात जुन्या सुर्यग्रहणाचा शोध लागला आहे. हिंदू धर्मातील ऋग्वेदात या सुर्यग्रहणाची नोंद आहे. हे सुर्यग्रहण तब्बल ६ हजार वर्षांपूर्वी घडले होते. ज्याचा उल्लेख हिंदू धर्माच्या चार वेदांपैकी ऋग्वेदात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा शोध एका भारतीय आणि दुस-या जपानी संशोधकांनी लावला आहे.

या सुर्यग्रहणांची नोंद हजारो वर्षांपूर्वी नोंदवून ठेवलेली आढळली आहे. खगोलशास्रज्ञांनी ऋग्वेदात केलेला हा उल्लेख खरा असल्याचे सांगितले आहे. ही घटना सुमारे ६ हजार वर्षांपूर्वीची मानली जात आहे. ऋग्वेदात अनेक धार्मिक आणि अवकाश दर्शनाचे उल्लेख केलेले आहेत.

अन्य सर्व धार्मिक ग्रंथ आणि पुस्तकांसारखेच ऋग्वेदात प्राचीन घटनांचे उल्लेख आहेत. काही ग्रंथात प्राचीन वस्तूंबाबत आणि घटनांबाबत उल्लेख केलेला आहे. परंतू ऋग्वेद सर्वात जुने आहे. ज्यात अनेक वेळा वसंत संपात (श्ी१ल्लं’ ए०४्रल्लङ्म७- विषुववृत्त) मध्ये सुर्य उगवल्याचे उल्लेख आहेत. जेथे दुपारी सुर्य थेट डोक्यावर तळपतो.

एका जागी लिहीले आहे की, ओरियन (मृगशिर्ष) नक्षत्रात होत आहे. दुसरा तारका समूह नक्षत्रामध्ये आहे. या वर्णनानुसार त्यांनी खगोलीय तपास सुरु केला. तारीख शोधायला लागली. पृथ्वी सुर्याभोवती फिरता फिरता स्वत:च्या अक्षाभोवती तिरकी फिरते. या वेळेचा स्थानिक विषुववृत्त मीन नक्षत्रात आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, मृगशिर्ष (ओरियन) हे नक्षत्राचे नाव इसवी सन ४,५०० पूर्वी होते, आणि प्लीयेड्स (वसंत संपात) नक्षत्र इसवी सन पुर्व २,२३० पूर्वी होते.

या सांकेतिक भाषेचा अभ्यास भारतीय आणि जपानी संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी हे मान्य केले की, ऋग्वेदात अनेक अवकाशीय घटनांचा उल्लेख आहे. त्या घटना ज्यावेळी संशोधित झाल्या नव्हत्या तेव्हा लिहीलेल्या आहेत. ऋग्वेदाची भाषा जास्त सांकेतिक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे मयंक वाहिया आणि जपानच्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीतील मित्सुरू सोमा यांनी त्याचा अभ्यास केला आहे.

ऋग्वेद काळातील घटनांचा उल्लेख : दोन्ही संशोधकांना मृगशिर्ष नक्षत्राच्या वेळी स्थानिय विषुववृत्ताच्या आधारे तारीख शोधायला सुरुवात केली. कारण प्राचीन सुर्यग्रहण याच तारखेला झाले होते. हे सर्वात आधी नोंदवले गेलेले लिखित संपूर्ण सुर्यग्रहण मानले जात आहे. म्हणजे त्यावेळी ऋग्वेदात नोंदी लिहीणारे जिवित होते. त्यांच्या समोर ही घटना घडल्यानेच त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे.

दोन अन्य संस्कृतीत उल्लेख : या दोन संशोधकांनी केलेल्या गणनेप्रमाणे हे सर्वात जुने सुर्यग्रहण इसवी सन पूर्व २२ ऑक्टोबर ४२०२ रोजी आणि इसवी सन पूर्व १९ ऑक्टोबर ३८११ या दरम्यान केव्हा तरी घडले असू शकेल. सिरीयात यापूर्वी एका मातीचा टॅबलेट सापडला होता. त्यावर सर्वात जुन्या सुर्यग्रहणाचा उल्लेख होता. ही घटना इसवी सन पूर्व १३७५ ते १२२३ दरम्यानची मानली जात आहे. या शिवाय आयर्लंड येथे इसवी सन पूर्व ३३४० मध्ये सुर्यग्रहणाची रॉक कार्व्हींग (कातळ शिल्प) सापडली होती.

सूर्य ग्रहणाचे कारण वेगळेच…
या दोघांना प्राचीन सुर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आढळला. त्यांचा हा अभ्यास ‘स्टडी जर्नल ऑफ एस्ट्रोनॉमिकल हिस्ट्री एंड हेरिटेज’मध्ये प्रकाशित झाला आहे. ऋग्वेदात जी कहाणी सांगितली आहे ती राहु-केतूच्या दंतकथेपेक्षा वेगळी आहे. या राहु-केतूच्या दंतकथा नंतर रचल्या गेल्या असाव्यात. सुर्यग्रहणाचे कारण ऋग्वेदात वेगळे दिलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR